Archive for the ‘Uncategorized’ Category
तिच्यामागे जाऊण जाऊण,
ती वाटही झुरली,
हाती काहि आले नाही,
तिची आठवण तेवढी ऊरली…
-आदित्य
लहानपणापासून ऐकत आलोय की,
सरळ वळनाचं पोर नाही,
आता वळण हे सरळ कसं असेल ?
ते सरळ असतं तर मग ते वळण कसं ?
-आदित्य
तुझ्या माझ्या प्रेमातला संबंध,
एक कोम्प्लेक्स नंबरच आहे,
प्रेमाचा भाग रियल आहे,
पण लग्नाचा भाग जरा इमेजनरीच आहे,
एकमेकांशिवाय रहावतहि नाहि,
बाब अगदि बेरजेचि आहे,
आंतर्जातिय विवाहचा मुद्दा खटकतो,
त्याची वजाबाकि करणे मात्र गरजेचे आहे,
तुझं मझ्यावर अनं माझं तुझ्यावर,
प्रेम अगदि कसं रिलेशन मधे आहे,
आत्ता आपले ते एक्स्पोनेन्शिअल आहे,
पण लग्नानंतर म्हणे ते प्रपोर्शनल ग्राफ़च आहे,
३६ गुण जुळवणे ह्यांना बरे कळतं,
नाहि जुळले तर असं कोणचं आभाळ कोसळतं?
कधी ह्यांना कळणार, ३६ चं वैर जरी असलं,
तरी प्रेमात सगळे इक्वल इक्वल असतं,
खरच का लग्नाचे समीकरण एवढे अवघड आहे?
पण आपल्या प्रेमाचे गणित कुठे तेव्हा एवढे जड आहे?
तुलाहि कळाले अन ते मलाहि कळाले,
मग ह्या समाजाला कळायला काय गड्बड आहे?
म्हणुनच म्हणतो, तुझ्या माझ्या प्रेमातला संबंध,
एक कोम्प्लेक्स नंबरच आहे…
प्रतिष्ठेची हाव, यशाची धाव,
पैशाची भुख, शाररिक सुख,
मला काहि उमजत नाही,
गाड्यांची रांग, सत्तेची मांग,
‘शो-ऒफ़’ चा धंदा, गुन्हेगारीचा फ़ंदा,
मला काहि समज़त नाही,
सामाजिक विषमता, उच्च-निच भिन्नता,
वर्नभेद अन जातीवाद, हुंडाबळी अन निष्पाप घात,
मला काहि उमजत नाही,
जबाबदारयांची उणीव, ना वैचारिक जाणिव,
अगणित भ्रष्टाचार, शोषितांवर अत्याचार,
मला काहि समज़त नाही,
खरच, मला काहिच कसे कळत नाही?
- आदित्य
भौतिक्शास्त्राचे घन, द्र्व अन वायु हे अस्तित्व ह्याला नाही,
पण वजन ह्याला असावे लागते जे काही मोजता मात्र येत नाही,
गणितातलि लांबी रुंदी ह्यांच्याशी याचा काही संबंध नाही,
पण खोली ह्याला असल्याशिवाय ह्याची दखलही घेतलि जात नाही,
रसायनशास्त्राचे समीकरण आजवर ह्याला उमगले नाही,
पण अखंड प्रक्रिया करण्याचे काम ह्याकडून काही थांबत नाही,
अहो जीवशास्त्राचा जीवसुद्धा ह्याला नाही,
पण मानवजातीप्रमाणे माज़े खरे माज़े खरे केल्याशिवाय ह्याला दम ही भरवत नाही,
कोण हा, कुठुन आला ? इतिहास ह्याचा कुणाला ठाउक नाही,
रणांगणाशिवाय युद्ध खेळण्याची ह्याची हौस ही काही फ़िटत नाही,
भाषा नाही, व्याकरण नाही, ह्याला शब्दांची काही कमी नाही,
भले भले साहित्यिकही फ़िके पडतिल, ह्याच्यापुढे कुणाची मजल नाही,
मानवी नकाशावर भौगोलिक स्थान ह्याचे काही पक्के नाही,
काळवेळ काही असो, कुठेही टपकायची ह्याची खोड काही जात नाही,
चित्रातला रंग तो, संगितातला स्वर तो,
खेळातलो जोश तो, अन प्रेमातला आंधाळाही तोच,
तोच तो… तुमचा आमचा…विचार
-आदित्य